आनंदराव चव्हाण विद्यालयातर्फे आगाशिव डोंगरावर बिजारोपण व वृक्षारोपण

कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर (ता. कराड) येथे वन महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आगाशिव डोंगरावर प्रतिवर्षाप्रमाणे बिजारोपण व वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमास वन क्षेत्रपाल, कराड कार्यालयाच्या श्रीमती ललिता पाटील, वनरक्षक अक्षय पाटील, अभिजीत शेळके, अमोल माने, आत्माराम काळे, श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव, शेतीमित्र अशोकराव थोरात, मुख्याध्यापिका सौ.ए.एस. कुंभार, उप मुख्याध्यापक ए.बी. थोरात व पर्यवेक्षक बी.जी. बुरुंगले उपस्थित होते.
वनरक्षक अक्षय पाटील यांनी विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व, रोपे लावण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन केले. शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी विज्ञान प्रबोधिनी, कराड व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्यावतीने गेली २७ वर्ष बिजारोपण व वृक्षारोपण कार्यक्रम अविरतपणे चालू असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाबाबत माहिती दिली.
आगाशिव डोंगरावर इयत्ता आठवी व नववीच्या 200 विद्यार्थ्यांनी शंभर वड, चिंच, करंज, चंदन इत्यादी रोपांची लागवड केली. 75 विविध वृक्षांचे स्टम्प लावण्यात आले व विद्यार्थ्यांनी उन्हाळी सुट्टीमध्ये जमा केलेल्या आंबा, चिंच करंज, फणस व इतर 75 हजार बियांचे टोकन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने केले. यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांनी देखील वृक्षारोपणास मदत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.ए. माने, डी.एस. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान प्रबोधिनीचे सहसचिव एम.व्ही. कांबळे, बी.जी. चौरे, आर.एस. पांढरपट्टे, पी.डी. खाडे, व्ही.पी. कारके, कैलास मारकवाड, सौ. एस.ए. सकटे, सौ. एस.आर. भोरे यांनी प्रयत्न केले.