सातारा जिल्हाहोम
लघुलेखक पदावर तेजस्विनी करंजगार यांची नियुक्ती

कराड/प्रतिनिधी : –
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार लघुलेखक श्रेणी – ३ या पदासाठी झालेल्या निवडीमध्ये तेजस्विनी राजेंद्र करंजगार यांची निवड झाली आहे.
तेजस्विनी करंजगार या गावभाग, इचलकरंजी येथील रहिवासी आहेत. त्यांना दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, कोल्हापूर येथे रिक्त असलेल्या लघुलेखक श्रेणी – ३ च्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासन आदेश क्रमांक ३६/३३६ अन्वये हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या वतीने तेजस्विनी करंजगार हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.