कराडत छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

कराड / प्रतिनिधी :-
आप्पासाहेब कळके प्रतिष्ठान व राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चेअरमन बाबासाहेब कळके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती राजश्री शाहू महाराजांची 151 जयंती उत्साहात पार पडली. राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, पोलीस निरीक्षक ताशीलकर, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, नायब तहसीलदार राठोड, माजी उपनगराध्यक्ष व यशवंत लोकशाही आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व आघाडीचे सर्व नगरसेवक, भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी तसेच उत्पादन शुल्कचे विनोद बनसोडे, कराड नगरपालिकेचे तारळेकर, ए आर पवार, बनकर,अतुल शिंदे, नितीन काशीद, राहुल भोसले, भानुदास वास्के, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, उमेश शिंदे, निखिल ठोंबरे रोहन विभुते, अरुण शिंगण, हणमंतराव कराळे सर याबरोबरच विविध राजकीय पक्षाचे सामाजिक संघटनेचे शेतकरी संघटनेचे बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.