सातारा जिल्हाहोम

पोदारमध्ये ‘अॅडडफ्लुएंस – अ मीडिया एक्स्ट्रावर्गेजा’ उपक्रमाचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘अॅडडफ्लुएंस – अ मीडिया एक्स्ट्रावर्गेजा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेमध्ये सुमारे महिनाभर सुरू असलेल्या इंटिग्रेटेड इंग्लिश या विषयांतर्गत ‘मीडिया अनमास्कड’ या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे उ‌द्घाटन मराठी दिग्दर्शक गुरुदास उर्फ प्रवीण तानाजी पाटील यांच्या हस्ते झाले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या माध्यमांचे विश्लेषण, त्यातील प्रभाव, जाहिरार्तीचा परिणाम, तसेच समाजावर होणारा परिणाम यावर सखोल विचार मांडले. पोस्टर, रोल प्ले, प्रेझेंटेशन आणि लघुनाटिका अशा सर्जनशील पद्धतींनी विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली.

शाळेच्या उपप्राचार्या सौ. स्वाती नांगरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण तानाजी पाटील म्हणाले, इतक्या लहान वयात मुलं केवळ जाहिरात कशी काम करते, हे समजून घेत नाहीयेत; तर त्यामागील उ‌द्देश, तंत्र आणि प्रभाव देखील विश्लेषित करत आहेत. हेच खरं शिक्षण आहे, जे फक्त पुस्तकी मर्यादांमध्ये न राहता वास्तवाशी जोडलेलं आहे.

शाळेचे प्राचार्य अन्वय चिकाटे म्हणाले, जाहिराती केवळ उत्पादन विकण्यासाठी नसून, त्या विचार, भावना आणि मूल्ये सुद्धा प्रभावीपणे पोहोचवतात. विद्यार्थ्यांनी जाहिरातींकडे केवळ आकर्षण म्हणून न पाहता, त्यामागील उद्दिष्ट, भाषा, आणि प्रभाव याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. यामुळे त्यांची विचारशक्ती वाढते आणि ते सजग ग्राहक व समजूतदार नागरिक बनतात.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य अन्वय चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या सौ. स्वाती नांगरे, शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक विशाल जाधव, कार्यक्रमाच्या समन्वयिका सौ. मेघा पवार, इंटिग्रेटेड इंग्लिशच्या समन्वयिका सौ. सीमा शेळके, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, सृजनशीलता आणि माध्यमांची जाण निर्माण झाली असून पालक व शिक्षकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

Related Articles