सातारा जिल्हाहोम

मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये डॉ. शांतीकुमार पाटील यांचे ‘करिअर मार्गदर्शन’ विशेष व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : –

जिद्द, चिकाटी आणि तन्मयतेने कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा केल्यास ती गोष्ट आणि मिळणारे यश नक्कीच दिव्य असते, असे प्रतिपादन शेतकरी चळवळीचे पुरस्कर्ते, जैनापूर कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शांतीकुमार पाटील यांनी केले.

दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, दादासाहेब मोकाशी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व दादासाहेब मोकाशी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि. 30) जून रोजी ‘करिअर मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. शांतिकुमार पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी शिक्षणाचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या करिअरच्या संधी याचे महत्व पटवून दिले. तसेच कृषी पदव्युत्तर शिक्षण आणि पदवी अभ्यासानंतर बँकिंग, स्पर्धा परीक्षा, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ या क्षेत्रांतील दैदिप्यमान संधी या संदर्भात विशेष मार्गदर्शन केले. जिद्दीने यश मिळवता येते, हा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व  संचालक विलास चौधरी हे विद्यार्थी करिअर व विकासासाठी विविध व्याख्याने आयोजित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या कार्यक्रमासाठी सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.के.एस. घुटकडे, प्राचार्य ए.एस. ढाणे, प्राचार्य डॉ.पी.पी पाटील, प्राचार्य एस.इ. जगताप आणि सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी, सर्व घटक महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Related Articles