दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालचा शेरे येथे वृक्षारोपण

कराड/प्रतिनिधी : –
दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय आणि निसर्गसेवेचा ध्यास घेतलेल्या माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान, शेरे यांच्या संयुक्त सहयोगाने दि. 28 जून रोजी शेरे (ता. कराड) येथे वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात आला.
मंगळवार (दि. 1) जुलै रोजी महाराष्ट्र कृषि दिन व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी 250 वृक्षलागवड करून शाश्वत आणि निरोगी भविष्याचा निर्धार केला.
“निसर्ग एक सामाजिक बांधिलकी” या जाणीवेतून मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, संचालक विलास चौधरी, तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. घुटुकडे यांनी या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
वृक्षारोपणप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे प्रा.आर.एस. जाधव, प्रा.बी.बी. चव्हाण, तसेच माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानचे वैभव पाटील उपस्थित होते.