सातारा जिल्हाहोम

‘मर्चंट प्रतिष्ठानचे रक्तदान शिबिर उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

मर्चंट कुटुंब प्रमुख सत्यनारायण मिणीयार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. २९) जून रोजी मर्चंट मुख्यालय, कराड येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. मर्चंट कुटुंबातर्फे आयोजित या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमामध्ये मर्चंट परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. कराड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यामुळे शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सार्वजनिक गणेश मंडळ, कराड मर्चंट, महिला मर्चंट, सेवक, व्यापारी व नागरिक अशा  एकूण १७५ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले.

याप्रसंगी मर्चंट कुटुंब प्रमुख श्री. मिणीयार यांनी आपल्या भाषणात समाजातील प्रेम व आस्था या मूल्यांवर भर दिला. तसेच त्यांनी सार्वजनिक कार्यातील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

रक्तदान शिबिरातून संकलित झालेले रक्त सातारा येथील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित बालाजी ब्लड सेंटर यांच्यामार्फत गरजू रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कराड परिसरातील गरजू रुग्णांना मर्चंट कुटुंबामार्फत मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमावेळी कराड मर्चंट, महिला मर्चंट, मर्चंट प्रतिष्ठान, मर्चंट स्वयंरोजगार संस्था आदी संस्थांचे संचालक, चेअरमन व व्हाईस चेअरमन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केलेल्या सर्व कार्यकर्ते आणि रक्तदात्यांचे भारती मिणीयार यांनी आभार मानले.

Related Articles