सातारा जिल्हाहोम

प्राचार्य डॉ.एस.बी. केंगार यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांना सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्व, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संवर्धन, अध्यापनातील नवोपक्रम, महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत त्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यासाठी, तसेच समर्पण आणि शिक्षणातील योगदानाचे कौतुक करण्यासाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार इंडियन टॅलेंट ओलंपियाडद्वारे जाहीर करण्यात आला.

प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी हा पुरस्कार संपूर्ण महाविद्यालयाचे प्राध्यापक, पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचे श्रेय मानले आहे. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव आहे. आगामी काळात शैक्षणिक गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी अधिक जोमाने काम करत राहणार आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर, कराडचे चेअरमन बाळासाहेब पाटील, जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, तसेच संस्थेचे सदस्य व विश्वस्त अरुण पाटील (काका), सर्व संस्था सदस्य, ज्युनियर व सीनियर कॉलेजचे प्राध्यापक, कराड शहर व कराड परिसरातील मान्यवर व्यक्ती, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी प्राचार्य केंगार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles