यशवंतनगर ते पंढरपूर पायी वारी दिंडीचे आयोजन
सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावरून आज दिंडी होणार मार्गस्त
कराड/प्रतिनिधी : –
आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या स्मरणार्थ, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना व परिसर याच्या सौजन्याने, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, यशवंतनगर ते पंढरपूर श्री संत गाडगेनाथ महाराज आषाढी पायी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहीती दिंडी सोहळा कमिटीच्यावतीने काका गुरूजी, अशोकराव थोरात, अमृतराव थोरात, बाजीराव थोरात, शिवाजीराव जाधव, हणमंत महाराज अंतवडीकर, मनोज जगदाळे फौजी, तानाजी थोरात यांनी दिली.
ही दिंडी यशवंतनगर येथून दि. 26 जून रोजी दुपारी 1 वाजता मार्गस्त होणार असून, अंतवडी, उंचीठाणे, वडूज (काळेवस्ती), गोंदवले बु., पंतवस्ती म्हसवड, भाळवणी, गादेगांव फाटा या मार्गे पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे.
प्रारंभी, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दिंडी-पालखीचे पुजन करण्यात येणार आहे. दिंडी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी संतपंगत, किर्तन, भजन सेवा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. परिसरातील भाविक भक्तांनी या दिडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडी सोहळा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.