सातारा जिल्हाहोम

उचाट येथे २१० फणसाच्या जातीच्या रोपांची वृक्ष लागवड

सातारा/प्रतिनिधी : –

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था, सातारा यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली ‘एक पेड मॉ के नाम’ अंतर्गत तालुक्यातील सहकारी संस्थांना वृक्ष लागवड करणे व त्याचे संवर्धन करणे तालुक्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था महाबळेश्वर अनुराधा पंडितराव यांनी आवाहन केल्यानुसार प्रतिसाद म्हणून महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यात कामकाज करीत असलेल्या सहायक निबंधक, सहकारी संस्था, महाबळेश्वर यांच्यासह पंचशील विकास सेवा सोसायटी उचाट ता. महाबळेश्वर येथील शेतकरी सभासद व ग्रामस्थ यांनी  मौजे उचाट व कांदाटी खोऱ्यातील परिसरामधील २१० फणसाच्या जातीच्या रोपांची वृक्ष लागवड केली.

यावेळी सहाय्यक निंबधक अनुराधा पंडिराव, सहकारी अधिकारी प्रमोद चतुर, सुहास आंब्राळे, सोसायटीचे चेअरमन संजयराव मोरे सोसायटीचे सचिव सोपान सपकाळ आदी ग्रामस्थांच्या मदतीने हा वृक्षरोपणांचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती अनुराधा पंडितराव यांनी वनस्पतीचे मत्त्व व त्या पासुन होणारी वायुनिर्मिती – तेल निर्मिती उदा., सी. एन. जी. निर्मितीचे महत्व सांगितले. प्रमोद चतुर, सहकारी अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विषद करुन सांगितले.

Related Articles