कराड भाजपच्या योग शिबिरांस उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने कराडमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. भाजपा मंडल अध्यक्षा सौ. सुषमाताई लोखंडे व संयोजक एकनाथ बागडी यांच्या पुढाकाराने हे उपक्रम पार पडले.
कराडमधील आवटे कॉम्प्लेक्स, कार्वे नाका व एम. आर. ओसवाल हॉल, सोमवार पेठ या ठिकाणी स्वतंत्र शिबिरे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध आसने, श्वसनाचे प्रकार व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरांना योग शिक्षक बापू देसाई, योग शिक्षक नेनमल ओसवाल, संयोजक एकनाथ बागडी व योग मार्गदर्शक सायली भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ. विद्या पावसकर, प्रमोद शिंदे, अजय पावसकर, राहुल आवटे, मंजिरी कुलकर्णी, धनश्री रोकडे, भारती शिंदे, सुमन बागडी, सुरेखा सूर्यवंशी, सुजाता मुठेकर, जनाबाई जाधव, राजश्री कारंडे, सौ. मोहिते, सरिता हरदास, प्रीती मुढेकर, मीना लोहार, सोपान तावरे, राजेंद्र खोत, रमेश मोहिते, विनायक घेवदे, कृष्णा रैनाक, अभिषेक भोसले, नितीन भोसले, सागर माने, संतोष मुठेकर, सतीश लोहार, संजय मुठेकर, शैलेश गोंदकर, सागर, विशाल आदींसह अनेक योगप्रेमी उपस्थित होते.