सातारा जिल्हाहोम

दादासाहेब मोकाशी कॉलेजच्या श्रेयश मोकाशीचे एमएच-सीईटी परीक्षेत यश

कराड/प्रतिनिधी : –

दादासाहेब मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान राजमाची संचलित वेस्टफिल्ड ज्यूनियर कॉलेज, राजमाचीच्या सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांनी एमएच-सीईटी 2025 परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. कॉलेजमधील श्रेयश प्रमोद मोकाशी याने पीसीएम ग्रुपच्या सीईटी परीक्षेत 99.54 टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले. यानिमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यामध्ये कॉलेजच्या जयदीप संजय घाटे, आर्या सुधीर सावंत, चेतन माने, अनिरुद्ध डुबल आणि आदिनाथ पाटील या विद्यार्थ्यांनी देखील सीईटी परीक्षेत उत्तम यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विविध विद्याशाखेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles