कराड उत्तरमधील सौर हायमास्ट दिव्यासाठी दोन कोटी ९५ लाख मंजूर
आ. मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नामुळे आठ गावे होणार प्रकाशमय
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास

योजना’ ठिकाठिकाणी राबविली जात आहे. याअंतर्गत कराड उत्तरमधील आठ गावांमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये १५ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार प्रयत्नशील आहे. अनुसूचित जाती बौद्ध घटकांतील वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून कराड उत्तरमधील आठ गावांमध्ये १५ सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी करण्यासाठी, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे दोन कोटी ९५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या निधीतून कराड उत्तरमधील कन्हेरखेड येथे २५ लाख, अंतवडी १५ लाख, हजारमाची वॉर्ड क्र.१ माऊली कॉलनी, वॉर्ड क्र. २ अंजनी गॅस गोडाऊन येथे २० लाख, वॉर्ड क्र.४ रेल्वे स्टेशन ते सोनवले बनसोडे वसाहत, वॉर्ड क्र. ५ इंदिरानगर वस्ती येथे २० लाख, वॉर्ड क्र.३ पळशेवाडा व वीरकायदे वसाहत, वॉर्ड क्र. ४ सातपुते साठे सुर्यवंशी वसाहत येथे १५ लाख, वॉर्ड क्र.४ रेल्वे स्टेशन ते सोनवले बनसोडे वसाहत, वॉर्ड क्र.५ इंदिरानगर वस्ती येथे १५ लक्ष, वॉर्ड क्र.६ राजारामनगर येथे २० लक्ष, वॉर्ड क्र. ५ कल्पतरू वसाहत, वॉर्ड क्र. ६ संजयनगर ते ओगलेवाडी वसाहत, वॉर्ड क्र. ६ आंबेडकरनगर येथे २० लाख, करवडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्ती येथे २० लाख येथे सौर हायमास्ट दिव्यांची उभारणी केली जाणार आहे.
याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून, या विकासकामांसाठी तातडीने आराखडा सादर करुन, निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या मूलभूत सोयीसुविधांचे काम मार्गी लागून, कराड दक्षिणमधील ११ गावांमधील विविध अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील वसाहती हायमास्ट दिव्यांनी उजळणार आहेत. या निधीबद्दल ग्रामस्थांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, खा. उदयनराजे भोसले यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.