सातारा जिल्हाहोम

स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

मोकाशी शैक्षणिक संकुलात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम

कराड/प्रतिनिधी : –

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलामध्ये, गुरुवार (दि. १९) रोजी स्व. दादासाहेब उर्फ भगवानराव मोकाशी यांची २० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी, संचालक विलास चौधरी, लेखा विभाग प्रमुख श्री. कदम, तसेच विविध घटक महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा. ए.एस. ढाणे, डॉ. के.एस. घुटुकडे, डॉ. पी.पी. पाटील, प्रा. एस.ई. जगताप, प्रा. डी.एस. सुर्यवंशी, प्रा. एस.एस. पवार, प्रा. एस.जी. कांबळे, प्रा. आर.एस. जाधव, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे संचालक विलास चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. दादासाहेब मोकाशी यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभे केलेले शैक्षणिक संकुल, आधुनिक अभ्यासक्रमांची उपलब्धता व एकात्मिक विकासासाठी घेतलेले प्रयत्न यांची सविस्तर माहिती दिली.

प्राचार्य प्रा. ए. एस. ढाणे यांनी दादासाहेबांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या संस्था व अभ्यासक्रमामुळे आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षणाच्या संधी प्राप्त होत असल्याचे नमूद केले. त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यपद्धतीचे आणि भविष्यातील योजनांचे विवेचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी.एस. सुर्यवंशी, प्रा. एस.एस. पवार यांनी आभार मानले.

Related Articles