सातारा जिल्हाहोम

श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श विद्यालयाचे यश

कराड/प्रतिनिधी : –

इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक व इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या पर्वतयारीच्या दृष्टीने चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशुविहार आगाशिवनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.

यामध्ये इयत्ता चौथीमधील अंशुल सुरेश शिंदे याने २३० गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक मिळविला. मंथन मयूर गरुड याने (२२८ गुण) द्वितीय, विराज किशोर पाटील (१९२ गुण) तृतीय, श्रेयस सचिन चव्हाण (१९० गुण) चतुर्थ क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या सर्व विद्यार्थ्यांना श्री मळाईदेवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सोपान जगताप, सौ. अश्विनी यादव यांच्यासह सौ. रंजना कांबळे, सौ. प्राजक्ता पाटील, रफिक सुतार, वैभव शिर्के, सौ. नंदा पानवळ, सौ‌. शबाना मुल्ला, सौ. रूपाली कुंभार, सौ. सारिका पवार, सौ. आकांक्षा झुमर, सौ. सोयराबानू नदाफ, सौ‌. वनिता कुंभार, सौ. मेघा बाटे, सौ. शितल भिसे, सौ. शोभा मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन शिंदे, शिशु विहारच्या मुख्याध्यापिका लता नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, संचालिका  डॉ. स्वाती थोरात, संचालक संजय थोरात यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Related Articles