कराडमध्ये रविवारी उद्योजक सत्कार सोहळा
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची विभागीय बैठकीचे आयोजन

कराड/प्रतिनिधी : –
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक आणि नियुक्ती प्रदान सोहळा रविवारी (दि. २२) जून रोजी कराड येथील हॉटेल संगमच्या बँक्वेट हॉलमध्ये पार पडणार असल्याची माहिती महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. सोनल भोसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची ही संयुक्त बैठक असून, यावेळी काही नवोदित उद्योजकांचा विशेष सत्कारही होणार आहे. महासंघाने सन २०२५ ते २०२७ या तीन वर्षांचा कालावधी उद्योजकता वर्ष म्हणून घोषित केला असून, या उपक्रमांतर्गत श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड, कराडचे चेअरमन रवळनाथ शेंडे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कॅप्टन आशिष दामले, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखील लातूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महासंघाचे पदाधिकारी चिवटे, काणे, बोडस, बापट, ओझा, आपटे, शरयू माटे, मैत्री कुलकर्णी, डॉ. वर्षा देशपांडे उपस्थित होते.