लिगाडे-पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत अतुलनीय यश

यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत प्रा. बाजीराव पाटील, प्रा. विजय लिगाडे तसेच शिक्षक व मान्यवर.
कराड / प्रतिनिधी : –
भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल लागला असून कराड येथील लिगाडे पाटील कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जगप्रसिध्द अशा आयआयटीमध्ये जाण्यासाठी घवघवीत यश मिळवले. यावर्षी कु. साहिल शंकर लाडे या विद्यार्थ्याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवले आहे. त्याला ऑल इंडिया रैंक ३४५ आहे. जगप्रसिध्द अशा इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याची निवड झाली आहे. त्याने बोर्ड परिक्षेत ८९.२० टक्के गुण मिळविले आहेत. त्याला आता दहावीला ९४ टक्के गुण होते. याबरोबरच कु. श्रेयस कदम (एआयआर २१६६), कु. अभिमन्यु घाडगे (एआयआर ६२६४), मानसी वाळके (एआयआर २३६६६) या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संस्थापक, अध्यक्ष प्रा. बाजीराव पाटील, उपाध्यक्ष प्रा. विजय लिगाडे, व्यवस्थापक राव, सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. गेल्या १२ वर्ष लिगाडे-पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जेईई व मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नीट या परीक्षेची तयारी करून घेतली जाते. प्रा. बाजीराव पाटील व प्रा. विजय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग व मेडिकलच्या प्रवेश परिक्षत यश मिळवले आहे. आता मुला, मुलींसाठी स्वतंत्र अत्याधुनिक वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. लवकरच कॉलेजमध्ये ८ वी ते १२ वी चा पाच वर्षाचा स्कूल इंटिग्रेटेड प्रोग्रॅम सुरू करण्याचा मानस असल्याचे कॉलेजच्यावतीने सांगितले आले आहे.