आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यानोकरी विषयकसातारा जिल्हाहोम

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालया मध्ये “पाणी फौंडेशन” मध्ये मुलाखतीचे आयोजन

 

दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालया मध्ये “पाणी फौंडेशन” मध्ये मुलाखतीचे आयोजन

कराड / प्रतिनिधी : –

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी सलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १० जून रोजी कृषि क्षेत्रात करीअर करु इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी “पाणी फौंडेशन” मध्ये मुलाखतीची संधी.
जलसंधारण व पाणलोटक्षेत्र विकास क्षेत्रात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये भरीव असे योगदान देणाऱ्या “पाणी फौंडेशन” या एन जी ओ मध्ये युवकांना सर्वोत्कृष्ट कौशल्याद्वारे गावापातळीवर, तालुकापातळीवर व जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी असून याचा लाभ सर्व इच्छुकांनी घ्यावा.
दादासाहेब मोकाशी शैक्षणिक संकुलातील प्रत्येक विध्यार्थ्यांची जडणघडण तसेच सर्वोत्तम करीअरसाठी संस्थेचे सचिव  अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजित मोकाशी व संचालक  विलास चौधरी यांचेकडून विशेष प्रयत्न केले जातात. घटक महाविद्यालयांचे प्राचार्य प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. के. एस. घुतुकडे. डॉ. पी. पी. पाटील यांच्या सहकार्याने विध्यार्थ्यांना पुढील यशस्वी करीअर “पाणी फौंडेशन” क्षेत्रात करता येईल; तरी इच्छुकांनी लाभ घ्यावा.

Related Articles