धनश्री चव्हाण – भोसले यांना पी.एचडी. प्रदान

कराड/प्रतिनिधी : –
येथील सौ. धनश्री चव्हाण – भोसले यांनी कृष्णा विश्व विद्यापीठामधून पी.एचडी. संपादन केली. विद्यापीठाचा नुकताच १३ वा दीक्षांत समारंभ पार पडला. या समारंभात कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा विश्व विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सौ. चव्हाण – भोसले यांनी फार्मासुटीकल सायन्सेस या विभागात चार वर्षे संशोधन केले आहे. डॉ. वंदना थोरात व डॉ. अमोल शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सदरचे संशोधन पूर्ण केले. नुकत्याच कृष्णा विश्व विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांच्यासह मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.