कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यार्थ्याचे जेईई अँडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश
आर्यन पवार जेईई ॲडव्हान्स परीक्षेत ऑल इंडिया २०९७ रॅंक

आर्यन पवार सत्कार करताना डॉ. महेश खुस्पे व सौ मंजिरी खुस्पे व इतर
कराड / प्रतिनिधी :-
भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल लागला असून कराड येथील कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्याने जगप्रसिद्ध अशा आयआयटीमध्ये जाण्यासाठी घवघवीत यश मिळवले.यावर्षी आर्यन चंद्रकांत पवार या विद्यार्थ्याने जेईई ॲडव्हान्स परीक्षेत यश मिळवले आहे. त्याचा ऑल इंडिया रॅंक २०९७ आहे. जगप्रसिद्ध अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याची निवड झाली आहे. तसेच त्याने बोर्ड परीक्षेत सुद्धा ८२.३३% मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कोटा अकॅडमी व कोटा ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ मंजिरी खुस्पे यांनी अभिनंदन केले आहे.
गेली १९ वर्षे कोटा अकॅडमी कराड येथे इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी व मेडिकल ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेईई नीट या परीक्षेची तयारी करून घेत आहे. कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ. मंजिरी खुस्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कोटा अकॅडमी कराडने आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना आयआयटी जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यात ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
देशातून दोन लाख पन्नास हजार मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यामधून कोटा च्या विद्यार्थ्याने अतुलनीय यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलांना आयआयटी सारख्या एम्ससारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळावा हा दृष्टिकोन ठेवून कोटा अकॅडमीची स्थापना खुस्पे दांपत्याने २००६ केली होती. कोटा अकॅडमी मध्ये सातवी ते बारावी पर्यन्त ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी संपर्क साधावा असे आव्हान कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी केले आहे.