सातारा जिल्हाहोम

‘करिअर इन कॉमर्स’ मेळावा आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

मलकापूर (ता. कराड) येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज व ना. आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर येथे ‘करिअर इन कॉमर्स’ या विषयावर विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी वाणिज्य शाखेतील करिअर संधी, कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व आणि व्यवसायातले वास्तव यावर सविस्तर मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांनी आवड, गरज व भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन शाखा निवडावी, शिक्षण व्यवहारात उपयुक्त ठरले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रा. डॉ. वावरे यांनी CA, CS, CFA, MBA, M.Com, B.Com, BCA, शेअर मार्केटिंग, फायनान्स व डिजिटल मार्केटिंग यांसारख्या अभ्यासक्रमांमधून निर्माण होणाऱ्या करिअर संधींबाबत मार्गदर्शन करताना बाजारपेठेच्या बदलत्या स्वरूपावरही प्रकाश टाकला.

यावेळी बाळासाहेब देसाई जूनिअर कॉलेज, पाटण येथील प्रा. विनायक माथने यांनीही वाणिज्य शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव सांगितले व बँकिंग व एलआयसी क्षेत्रातील रोजगार संधींबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी केले. विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आर. डी. पाटील यांनी, विभाग प्रमुख सौ. एस. डी. पाटील यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात, प्राचार्या सौ. ए. एस. कुंभार, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles