तनावमुक्त जीवनासाठी ‘सहज योग ध्यानधारणा’ कार्यक्रम
आज कराडमध्ये मोफत आयोजन; मानसिक शांतता, आत्मशांती व आंतरिक समाधानाचा अनुभव

कराड/प्रतिनिधी : –
आत्मशांती आणि जीवनातील संतुलन मिळवण्यासाठी ‘सहज योग ध्यानधारणा’ (Meditation) या विशेष ध्यानसत्राचे आयोजन आज रविवारी कराडमध्ये करण्यात आले आहे. ‘परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रेरणेतून सहजयोग पद्धतीने आत्मसाक्षात्कार (Self Realization) व तणावमुक्त जीवनशैली साधण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात कुंडलिनी शक्तीच्या जागरणाद्वारे आत्मसाक्षात्कार दिला जाणार आहे. ध्यानाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या ध्यानधारणा कार्यक्रमामुळे मानसिक शांतता, आत्मशांती व आंतरिक समाधानाचा अनुभव लाभतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे.
टिळक हायस्कूल, मंगलवार पेठ, कराड येथे आज रविवार (दि. १) जून रोजी सायंकाळी ६ वाजता का कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आपला सहजयोग परिवार, जिल्हा सातारा यांच्यावतीने करण्यात आले आहे.