आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम

कराड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड दीपक थोरात

उपाध्यक्षपदी ऍड. विशाल माने तर सचिवपदी ऍड. साईप्रसाद पाटील यांची निवड

कराड / प्रतिनिधी :-

कराड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अॅड. दीपक दिनकरराव थोरात विजयी झाले. उपाध्यक्षपदी अॅड. विशाल सुरेश माने तर सचिवपदाच्या निवडणुकीत अॅड. साईप्रसाद शरदचंद्र पाटील यांनी विजय मिळवला. कराड वकील संघटनेच्या वार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या तिरंगी लढतीत अॅड. दीपक थोरात यांनी नेत्रदीपक विजय मिळवला. उपाध्यक्ष, सचिव आणि महिला प्रतिनिधी यांच्यामध्ये दुरंगी लढती झाल्या. विशाल माने यांनी काट्याच्या लढतीत उपाध्यक्ष पद खेचून आणले

तर सचिव पदाच्या निवडणुकीत साईप्रसाद पाटील यांनी एकतर्फी मोठा विजय संपादित केला. सहसचिव म्हणून अॅड. निसार शेख बिनविरोध निवडून आले तर महिला प्रतिनिधीच्या निवडणुकीत अॅड. गौरी काकासाहेब पाटील यांनी विजय पटकावला. नूतन पदाधिकाऱ्यांनी नुकताच संघटनेचा अधिभार स्वीकारला. अध्यक्ष अॅड. दीपक थोरात यांचा ना. जयकुमार गोरे, आ. अतुल बाबा भोसले, माजी खासदार राजू शेट्टी, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सत्कार केला.

Related Articles