हाज यात्रेसाठी अत्यावश्यक लसिकरण व मार्गदर्शन शिबीराचे सोमवारी कराडमध्ये आयोजन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक हाजी जैनुद्दीनभाई भादी यांनी दिली माहिती

कराड / प्रतिनिधी :-
यावर्षी पुढील महिन्यात सौदी अरेबियातील मक्का- मदिना येथे संपन्न होणारी पवित्र हाज यात्रेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या हाज यात्रेला जाण्यापुर्वी मुस्लिम बांधवांसाठी मेंदुज्वर लस व पोलिओ डोस घेणे अत्यावश्यक आणि सक्तीचे असते. हाज कमेटी आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत हाजला जाणा-या यात्रेकरुंसाठी सोमवार दि.5 मे रोजी कराड येथील मोमीन मोहल्ल्यातील मौलाना अब्दूल अजिज हाँलमध्ये हे लसिकरण व हाज यात्रा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक हाजी जैनुद्दीनभाई भादी यांनी दिली.
कराड येथील शिबीरात हाजी अर्शद पठाण, हाजी महम्मदअली मोमीन व अन्य धर्मगुरुंचे हाज यात्रेबाबत मार्गदर्शन होणार आहे. शिबीराचे नियोजन हाजी बरकत पटवेकर, हाजी मजहरभाई कागदी, हाजी वाहीदभाई, हाजी इम्रान वाईकर व सहकारी करणार आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सक आणि कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.काझी,डॉ.शेख, डाँ.आतार, डाँ.आबिद मणेर व सहकारी लसिकरण करतील.
कराड येथील मोमीन मोहल्ला मस्जिदमध्ये सोमवारी दुपारी 12 ते 5 या वेळेत हे शिबीर संपन्न होईल. या शिबीरात हाज यात्रेविषयी अनुभवी धर्मगुरु, मौलाना विस्तृत मार्गदर्शनही करणार असुन दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था यात्रेकरुंसाठी करण्यात आली आहे. हाज यात्रेस जाणा-या सर्व मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हाजी जैनुद्दीनभाई भादी यांनी केले आहे.