रविवारी कराडला रुग्णांचे हक्क व अधिकारांवर व्याख्यान
माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन

कराड/प्रतिनिधी : –
माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार (दि. २७) रोजी रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयावर रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचे जाहीर व्याख्यान आहे. सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या व्याख्यानासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या व्याख्यानात उमेश चव्हाण हे कराड व परिसरातील नागरिकांना वैद्यकीय मदत कशी मिळवावी, शासनाच्या उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांच्या योजना कोणत्या, रुग्णांचे हक्क व अधिकार काय आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे संपूर्ण बिल माफ होते आदी महत्वाच्या विषयांवर व्याख्यान देणार आहेत. यावेळी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.