सातारा जिल्हाहोम

लाहोटी कन्या प्रशालाचे एनएमएमएस परीक्षेमध्ये उज्वल यश

कराड/प्रतिनिधी : –

शिक्षण मंडळ, कराड संचालित स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालीच्या २२ विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्तीधारक ठरल्या. तर श्रुती संदीप अजेटराव या विद्यार्थिनींने अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जिल्ह्यात २३ वा क्रमांक संपादन केला.

यामध्ये विद्यार्थिनी  सई जाधव, शमिका काळे, अनुष्का आमले, अक्षरा सूर्यवंशी, सिद्धी कदम, वेदिका गायकवाड, अदिती कोडलिंगे, वेदांतिका संकपाळ, ज्ञानेश्वरी पाटील, तेजस्विनी पाटील, अवंती पाटील, श्रावणी पाटील, ऋतुजा नलावडे, दिशा यादव, तनिष्का मार्कळ, सिद्धी सूर्यवंशी, प्राप्ती जाधव, गिरीजा पाटील, संस्कृती पाटील, श्रुती मोरे, कार्तिकी शिंदे व श्रुती शिंदे सारथी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत.

यशस्वी विद्यार्थिनींचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम, उपमुख्याध्यापिका छाया कुंभार, पर्यवेक्षिका सुनीता अवघडे, एनएमएमएस विभाग प्रमुख रूपाली काकडे, मार्गदर्शक शिक्षिका संगीता शेवाळे, सत्वशीला नांगरे, युवराज पोकळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles