आ. डॉ. अतुल भोसले यांनी घेतला पाणी टंचाईग्रस्त गावांचा आढावा

कराड/प्रतिनिधी : –
तालुक्यात जाणवणार्या पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर टंचाईच्या छायेत असललेल्या २५ गावांचा प्रामुख्याने आराखडा तयार केला आहे. त्यात कराड दक्षिण विधानसभेतील १३ तर, उत्तरेतील १२ गावांचा समावेश आहे. त्या गावात कामही चालू आहे. त्याशिवाय तालुक्यातील ४२ गावांचा टंचाई आराखडा स्वतंत्रपणे केला आहे. त्यात दक्षिणेतील २१ तर, उत्तरेतील २१ गावांवर लक्ष आहे, अशी माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
कराड तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रांगृहात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून एसडीआरचा आढावा घेतला. बैठकीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलादर कल्पना ढवळे, उपअभियंता प्रमोद चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मध्यमनशी संवाद साधताना ते बोलत होते.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, तालुक्यात टंचाईच्या आराखड्यात जवळपास ४२ गावांचा समावेश आहे दक्षिण, उत्तरेत प्रत्येकी २१ गावे आहेत. प्रत्यक्ष टंचाई घोषित केलेली गावे २५ आहेत. त्यामुळे प्रामुख्यान त्या गावांत टंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी चार टँकर प्रशासनाने टंचाई जनक स्थितीत दिले होते. त्या पध्दतीची तयारी यावर्षी केली आहे. टंचाई निर्माण होऊ शकते तिथे आधीपासूनच प्रशासन तयारीत आहे. उपाययोजनांसाठी समन्वयातून काम सुरू आहेत. उंडाळे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्याबाबतचे नियोजन आहे. त्यासाठी ७० लाख खर्चाचा प्रस्ताव मिळाला आहे. त्याला जिल्हा नियाेजनमधून मंजुरी घेवू. ओंड येथे बंदिस्त पाईपलाईनने पाणीपुरवठा होण्यासाठीची योजना आहे. ज्याला तांत्रिक अडचणीमुळे ती प्रलंबित आहे. सरकार पातळीवर मोठ्या प्रमाणावर त्याचा पाठपुरावा केल्याने त्याला हिरवा कंदील आहे. बंदीस्त पाईपलाईनने ओंडला पाणीपुरवठा झाल्यास गावाला कधीही पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्याचा प्राथमिक आराखडा २५ कोटींचा आहे.
ते म्हणाले, तालुक्यात पूर्ण न झालेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. मतदारसंघांत ९० गावांना पाणी योजना मंजूर आहेत. त्यापैकी अनेक गावांत २५ टक्केच काम पूर्ण झाले. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण न झालेल्या योजनांची माहिती घेवून पाच एप्रिलला जिल्ह्याची टंचाईची बैठकीत पालकमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी संगितले.
‘सह्याद्रि’त हस्तक्षेप नाही
सहकारी साखर कारखान्याचा मी सभासद नाही. परंतु, सहकारामध्ये मदतीचे राजकारण करायची संस्कृती असून त्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही, ही आमची भूमिका आहे. असे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.