सातारा जिल्हाहोम

श्री कालिकादेवी पतसंस्थेचा एकत्रित व्यवसाय २९२ कोटींच्यापुढे – मुनीर बागवान सावकार 

शुन्य टक्के एनपीए राखण्यात यश; 3 कोटी 21 लाखांचा निव्वळ नफा

कराड/प्रतिनिधी : – 
श्री कालिकादेवी पतसंस्थेचे संस्थापक कुटुंब जनक कै.गजानन (बाळासाहेब) बंडोबा मोहिरे, कै. जयंतीलाल भंडारी, कै. महेश त्रिभुवणे, संजीव मोहिरे यांनी लावलेले रोपटे आता तीन तपांची समृद्ध विकासाची अर्थपूर्ण वाटचाल पुर्ण करीत संस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २९२ कोटींच्या पुढे एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण करीत १५१ कोटी ८१ लाख ठेवी पूर्ण केलेल्या आहेत, अशी माहिती संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार यांनी दिली.
यामध्ये संस्थेचे माजी व्हा. चेअरमन स्व. जयवंतराव जाधव, संचालक मंडळ, चेअरमन राजन वेळापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक वेळापुरे व सेवक वर्ग यांचे मोठे सहकार्य व योगदान लाभले आहे. यामुळे संस्थेने यशस्वी प्रगती केली आहे.
संस्थेने निव्वळ NPA चे प्रमाण ०% (शुन्य टक्के) राखण्यात यश मिळविले आहे. तसेच कर्जथकबाकी ही अत्यंत अल्प प्रमाणात आहे. संस्थेला रुपये 3 कोटी 21 लाखचा निव्वळ नफा झाला आहे. संस्था बँकिग बरोबरच स्थापनेपासुन सामाजिक कार्यकरीत आपला वारसा जपत आली आहे. संस्था सभासदांना विविध सेवा सुविधा नेट बँकिंगच्या माध्यमातुन देऊन बँकिंग सेवेची मालिका श्री कालिका हे ब्रिद वाक्य पुर्ण करीत आहे.
संस्थेच्या कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेत व सातारा येथे राजपथ कमानी हौदा समोर गुरुवार पेठ सातारा येथे स्वमालकीच्या अत्याधुनिक वास्तु आहेत. यामध्ये लॉकर सुविधा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या माध्यमातुन ई-पेमेंटद्वारे स्टॅम्प फी, रजिस्टर फी, GST, इंन्कमटॅक्स, व्हॅट, टी.डी.एस., DHC, सर्च फी अशा सुविधांच्या बरोबर RTGS/ NEFT शासकीय व ट्रेझरी चलने या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
संस्थेस या आर्थिक वर्षात दिलेल्या अमुल्य सहकार्याबद्दल सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचे आभारी असुन पुढील आर्थिक वर्षात देखील असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा सेवक वर्गाने केली आहे.

Related Articles