आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम

रामकृष्ण वेताळ यांच्या सभासद भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

ओगलेवाडी / प्रतिनिधी : –

सह्याद्री कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी रंगात आली आहे. स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल चे नेते रामकृष्ण वेताळ यांनी परिवर्तनाच्या लढाईसाठी पायाला भिंगरी बांधली आहे.त्यांच्या गावभेटी,सभासद भेटी कार्यक्रमाला सभासदांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.यामुळे निवडणूक रंगतदार अवस्थेला पोहोचली आहे.

सध्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कराड, सातारा, कोरेगाव,खटाव आणि कडेगाव या तालुक्यात कार्यक्षेत्र असलेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात नावाजलेला साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळेस तिरंगी होत आहे. स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल च्या माध्यमातून पर भाजपा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि कराड उत्तरचे भाजप नेते रामकृष्ण वेताळ, तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल निवडणूक लढवीत आहे.या पॅनलच्या प्रचारासाठी रामकृष्ण वेताळ दिवस रात्र पायाला भिंगरी बांधून गावभेटी व सभासद भेटीचा दौरा काढत आहेत.

मसूर परिसर,पाली परिसर,उंब्रज परिसर त्यांनी अक्षरशः पिंजून काढला आहे.सह्याद्री कारखान्यात मागील काळात झालेला गैरकारभार ते लोकांच्या नजरेस आणून देत आहेत.त्याचबरोबर सह्याद्री हे कराड करांचे श्रद्धास्थान असून या कारखान्याचा कारभार करण्यासाठी कराड तालुक्यातीलच नेतृत्व हवे. विरोधकांच्या वळचणीला सह्याद्री उभा होऊ देणार नाही ही आपली भावना ते लोकांना पटवून देत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभासद भेटीच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देत आहेत. सभासदांच्या मध्ये विचार चालना जागृत होऊन मतपरिवर्तन करण्यात रामकृष्ण वेताळ यशस्वी होत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे स्वाभीमानी सभासद परिवर्तन पॅनलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे.गावागावात त्यांचे उत्साहाने स्वागत करून विचार ऐकण्यासाठी लोक जमत आहेत.त्यांच्याबरोबर उमेदवार आणि समर्थक मोठ्या संख्येने विजयासाठी कष्ट घेत आहेत. फोटो नेम मरळी येथे सभासदांना रामकृष्ण वेताळ यांनी मार्गदर्शन केले

Related Articles