सातारा जिल्हाहोम

बाळासाहेब पाटील यांचा रविवार 30 मार्च रोजी चा प्रचार दौरा

कराड / प्रतिनिधी : – 

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. श्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पी डी पाटील पॅनलचा प्रचार दौरा रविवार दिनांक 30 मार्च, रोजी सकाळी 9.30 वा. कराड शहर (ठिकाण – कन्या शाळा), सायंकाळी 6.00 वा.चिखली ता. कडेगांव आणि

सायं. 7.00 वा. कडेपूर ता. कडेगांव येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेस बाळासाहेब पाटील स्वतः उपस्थित राहून कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रचार सभेसाठी कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles