आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

जनकल्याण पतसंस्थाच्या उपाध्यक्षपदी  अभिजीत चाफेकर यांची निवड

कराड  / प्रतिनिधी : – 

येथील जनकल्याण नागरी पतसंस्थेचे  उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने संस्थेचे उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते. सदरहू रिक्त पद भरणेकामी मा.जे.पी. शिंदे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सातारा तथा अध्यासी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संचालक मंडळ सभेमध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये  अभिजीत चाफेकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.  अभिजीत चाफेकर हे कराड शहरातील नामांकित तरुण उद्योजक आहेत. निवडीनंतर सर्व संचालकांच्या वतीने व  जे.पी. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यावेळी  चाफेकर म्हणाले ‘तरुण वयात एवढ्या मोठ्या संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी संचालक मंडळाने माझ्यावर सोपवली व मला सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी दिली या बद्दल मी प्रथमतः संचालक मंडळाचे आभारी आहे. आपणा सर्वांच्या सहकायनि व मार्गदर्शनाखाली मी प्रामाणिकपणे संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन.’

संचालक सीए, आशुतोष गोडबोले यांनी आभार मानले यावेळी  अध्यक्ष  चंद्रशेखर देशपांडे व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थितीत होते.

Related Articles