कृष्णा कृषी महाविद्यालयाचे कृषी विद्यापीठ करण्याचा मानस : आ. डॉ. अतुलबाबा भोसले
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

आ.डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, आज कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी सर्व क्षेत्रात कार्यरत असलेले दिसतात, या शाखेला भविष्य आहे. कृषी विद्यार्थ्यांना भविष्य आहे. कृषी शाखेचे शिक्षण घेतल्यास शंभर टक्के नोकरी मिळू शकते असा विश्वास आहे. विद्यार्थ्यांचाही कल कृषी शिक्षणाकडे आहे. या महाविद्यालयाला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आ. डॉ.अतुलबाबा भोसले यांनी विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, भागातील मुलांना कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज सर्व सुविधा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून आपले करिअर बनवावे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधन करून शेतकर्यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा प्रकारांमध्ये, विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वयंचलित कृषी हवामान केंद्राचे उदघाटन
फुले स्मार्ट या स्वयंचलित कृषी हवामान केंद्राचे आणि महाविद्यालयातील बहुउद्देशीय हॉलचे उदघाटन आ.डॉ.अतुलबाबा भोसले व चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्वयंचलित हवामान केंद्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कृषी अभियांत्रिकी विभागाकडून महाविद्यालयास मिळाले आहे. भविष्यात या केंद्राचा कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.