दत्तात्रय जाधव यांचा आज वाढदिवस
विविध उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा

कराड / प्रतिनिधी : –
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे उप पंतप्रधान स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय जाधव यांचा ९१ वा वाढदिवस शनिवार दि.१ मार्च रोजी विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.
कार्वे (ता.कराड) या गावात शेतकरी कुटूंबात जन्मलेले दत्तात्रय जाधव यांनी विविध चळवळीमध्ये काम केले. त्यांचे काम पाहून स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यांची सातारा जिल्हा काँग्रेसचे संघटक म्हणून नियुक्ती केली होती. तसेच शिवराज गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब उपपंतप्रधान झाले व पहिल्यांदा कराडला आले तेव्हा कराड येथे दत्तात्रय जाधव यांनी चव्हाणसाहेबांचा भव्य सत्कार घेतलेला होता.
स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांचे विश्वासू साथीदार म्हणून दत्तात्रय जाधव यांची ओळख आहे. कार्वे परिसरात दत्तात्रय जाधव हे कार्वेकर पुढारी या नांवाने सुपरिचित आहेत. त्यांचा राजकीय व सामाजिक वसा घेऊन त्यांचे चिरंजीव, कराड तालुका शिवसेना प्रमुख काकासाहेब जाधव हे कार्यरत आहेत.