कोटा अकॅडमी येथे सातवीचे प्रवेश सुरू

कराड / प्रतिनिधी : –
गेले वीस वर्षे कराड येथे कोटा अकॅडमी कार्यरत असून इयत्ता आठवी पासूनच आय. आय.टी. जे.ई.ई., नीट, एम.एच.टी सी.ई.टी. सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून करून घेतली जाते. पालकांच्या आग्रहास्ताव कोटा अकॅडमी या वर्षीपासून इयत्ता सातवी पासूनचे वर्ग सुरू करत आहे. शालेय स्तरावर असणाऱ्या विविध ऑलिम्पियाड परीक्षांचीही तयारी करून घेतली जाते. ज्यामध्ये इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड, जनरल नॉलेज ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड व इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड या विषयांचा समावेश होतो. कोटा अकॅडमीमध्ये इयत्ता सातवी, आठवी, नववी व दहावी या वर्गाचे बेसिक फाउंडेशन म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी या विषयांची तयारी केली जाते.
गेली १९ वर्षांमध्ये कोणत्या अकॅडमीचे ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी आय.आय.टी., एन.आय.टी., आय.आय.आय.टी. तसेच विविध शासकीय इंजिनिअर व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवड झालेले आहेत. कोटा अकॅडमीला शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामधील कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. इयत्ता सातवी पासूनच फाउंडेशनची तयारी केल्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी मध्ये आय.आय.टी. जे.ई.ई., नीट व सी.ई.टी. सारख्या परीक्षांची तयारी होते. इयत्ता सातवी ते बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक पालकांनी शनिवार पेठ कराड येथील कोटा अकॅडमीशी संपर्क साधावा असे आवाहन कोटा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश खुस्पे यांनी केले आहे.