स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन

कराड / प्रतिनिधी :-
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 59 वी पुण्यतिथी निमित्त सावरकर स्मारक समिती आणि शहर भाजप कराड यांच्या वतीने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आली याप्रसंगी समितीचे अध्यक्ष काका जोशी समितीचे सदस्य आनंद पेंढारकर, अवधूत कुलकर्णी, घनश्याम पेंढारकर, भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष सोपान तावरे, अभिजीत घाटगे, सातारा जिल्हा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बापू जंत्रे, बी बी एन जी चे सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी, उद्योजक शशांक शेंडे व्यापारी इनामदार, आणि इतर सावरकर प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
सावरकरांच्या साहित्य आज काल आणि उद्या या विषयावर होणाऱ्या नरेंद्र पाठक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे यासाठी काका जोशी यांनी लोकांना जाहीर आवाहन केले.