सातारा जिल्हाहोम

वाकुर्डे योजनेतून कराडचे 22 हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येणार – आ. डॉ. अतुलबाबा भोसले

वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्यातील वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेवर अवलंबून असलेले 22 हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी .47 टीएमसी पाणी राखीव आहे. या पाण्यातील थेंब अन् थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार (दि. २१) रोजी दुपारी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीला टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, वारणा उपसा जलसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, लघुपट बंधारे सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बूब, वारणा उपसा जलसिंचन प्रकल्पाचे उपअभियंता अनिल लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, या बैठकीमध्ये कराड तालुक्यासाठी वाकुर्डे योजनेमध्ये .47 पीएमसी पाणीसाठा राखीव आहे. या पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. वाकुर्डेच्या कराड तालुक्यातील लाभक्षेत्रातील तब्बल 22 हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी .47 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. या योजनेवर असलेल्या कराड तालुक्यातील बंधाऱ्यांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये कराड तालुक्यासाठी राखीव असलेल्या पाण्याचा थेंब अन् थेंब कराड तालुक्याला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच वाकुर्डे योजनेचे नियमित पाणी सर्व परिसराला मिळणार असल्याबाबत प्रशासनाने खात्रीशीर शब्द दिला आहे. त्यामुळे दरवर्षी येळगाव आणि काले जिल्हा परिषद गटातील गावांची पाण्याची अडचण दूर होणार असून त्यांना नियमित पाणी मिळणार आहे.

तसेच 8119 योजनेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 मध्ये धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यातील १९ टक्के पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार होते. त्याचाही भार कमी व्हावा, या दृष्टीने वाकुर्डे योजनेवर सोलर सिडर लावण्यासाठी त्याचे इस्टिमेट करण्याच्या सूचना आपण प्रशासनास दिल्या असल्याचे आ. डॉ. भोसले यांनी सांगितले. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी कराड परिसरातील विशेष प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ओंड येथील बंदिस्त पाईपलाईन करण्याच्या संदर्भात इस्टिमेट करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यासंदर्भात श्री रेड्डीयार यांनी इस्टिमेट केले होते. त्यावेळी 25 कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र तो आता 54 कोटींवर होणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर शेवटची बैठक होऊन जलसंपदा विभागाला तो प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्यामुळे येत्या काळात सदरच्या बंदिस्त पाईपलाईनचे काम चालू होईल, असेही एका प्रश्नावर बोलताना आ. डॉ. भोसले यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक गावाच्या पाण्याच्या मागणीसंदर्भात जलसंपदा विभागाने लेखी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार त्यांना अपेक्षित पाणी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर कराड तालुक्यात वाकुर्डे योजनेवर चार बंधारे असून जलसंपदा विभागाचेही चार बंधारे आहेत. अशा एकूण आठ बंधाऱ्यांची सद्यस्थिती जाणून घेत त्यांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाला पाठवण्यात येणार आहे. तसेच वाकुर्डे योजनेचे लाईट बिल कृष्णा कारखान्यामार्फत भरण्यात येत असून यावर्षीचेही लाईट बिल कृष्णा कारखाना देणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

Related Articles