आयुष्यमान स्पेशलआरोग्य धनसंपदामहाराष्ट्रहोम

आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान करून विश्वविक्रम

औषध विक्रेत्यांनी संपूर्ण देशभरात एकाच दिवशी रक्तदान करून केली विश्वविक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद

 

कराड / प्रतिनिधी : –

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष  आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त व अखिल भारतीय औषध विक्रेते संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त औषध विक्रेत्यांनी संपूर्ण देशभरात रक्तदान व रक्तदानासाठी शपथ असा कार्यक्रम आखला या कार्यक्रमास देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने देशभरात 80 हजार 306 रक्तदात्यांनी शपथ घेत व 70 हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांनी एकाच दिवशी रक्तदान करून विश्वविक्रम केला. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

संघटनेचे नेते माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे यांचा 75 वा वाढदिवस देशातील केमिस्ट्र बांधवांनी एक वेगळा उपक्रम राबवून साजरा करण्याचा निर्णय घेतला करण्याचा त्यानुसार देशभरातील सर्व औषध विक्रेत्याने एकच दिवशी रक्तदान करणेसाठी शपथ व रक्तदान करण्याच्या करण्याचा मानस जाहीर केला . त्याच दिवशी देशभरातील 80 हजार तीनशे सहा औषध विक्रेत्यांनी रक्तदान करण्याची शपथ घेतली व प्रत्यक्षात 70000. पेक्षा अधिक रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान करून एक वेगळा विश्वविक्रम केला या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये करण्यात आली असल्याची माहिती गिनीज ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलिंद बेलेकर व स्वप्नील डंगरीकर यांनी दिली यावेळी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हाती या वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या विश्वकर्मी नोंदीसाठी संघटनेचे देशातील व महाराष्ट्रातील औषध विक्रेते, फार्मासिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ,फार्मसी कॉलेज, औषध दुकानातील कर्मचारी वर्ग यासह अनेक जणांनी सहभाग घेतला व रक्तदान केले गाव पातळी ते तालुका, जिल्हा, राज्य,देश, पातळी व जिल्हा पातळीपर्यंत केमिस्ट्री असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध करत हा विश्वविक्रम नोंदवला.करता आला असे गौरवोद्गार यावेळी संघटनेच्या उपक्रमामुळे देशाला व राज्याला हजारो नवीन रक्तदाते मिळाल्या असून यापुढे रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू रोखण्यास मोठी मदत होऊ शकते असा द्रृढ विश्वास संघटनेचे सातारा जिल्हा केमिस्टंट पाकिस्तानचे अध्यक्ष सागर पाटील यांनी व्यक्त केला. या विश्वकर्माबद्दल संघटनेचे व पदाधिकाऱ्यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles