मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे यश

कराड / प्रतिनिधी :-
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय राजमाची मधील माजी विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परिक्षेमध्ये यश संपादन करून विविध पदासाठी निवड
दादासाहेब मोकाशी महाविद्यालयातील विद्यार्थी गणेश वाळके (२०१४-२०१८), दिग्विजय खाडे (२०१८-२०२२), स्वराज वाघ (२०१९-२०२३), या विद्यार्थ्यांची आय.डी. बी.आय बॅचमध्ये एक्झिक्युटिव्ह सेल्स कॉपरेशन पदी निवड झाली असून संकेत पाटील (२०१९-२०२३), मयूर शिंदे (२०१९-२०२३) याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अतंर्गत कृषी अधिकारी पदी निवड झाली तर मानसिंग गुलीग (२०१९-२०२३), याची ग्रामसेवक पदावरती निवड झाली. अभ्यासातील सातत्य, चिकाटी यामुळे यशाला गवसणी घालून पदवीमधील विद्यार्थ्यांच्यामध्ये प्ररेणा निर्माण करतात.
विविध परिक्षेच्या माध्यमातून पदावरती रूजू होणा-या विद्यार्थ्यांचे मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी, संचालक विलास चौधरी, प्राचार्य डॉ. के. एस. घुडूकडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व घटक महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.