कराड रोटरी च्या दृष्टी अभियानातंर्गत 16 रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया
डॉ. राहूल फासे यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

कराड/प्रतिनिधी : –
रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या रोग प्रतिबंधक आणि उपचार अंतर्गत दृष्टी अभियानाच्या माध्यमातून येथील स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा
रुग्णालय, कराड येथे रो.डॉ.राहुल फासे व त्यांच्या टीमने 16 रुग्णांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. रोटरी रोटरी क्लब ऑफ कराड च्या माध्यमातून मोफत नेत्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फेरतपासणी करून रुग्णांना घरी सोडताना रुग्णांच्या चेहर्यावरील हास्य व समाधान हेच या उपक्रमाचे यश दिसत होते.
यावेळी स्व.सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनीला लाळे, रोटरी क्लब ऑफ कराड अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सेक्रेटरी आनंदा थोरात, रोटरी क्लब व संस्कार नेत्र रुग्णालयाचे संचालक डॉ.राहूल फासे, रोटरीचे संचालक अभय नांगरे, शिवराज माने, किरण जाधव, डॉ.देसाई, डॉ.चोपडे, हर्षला देशमुख आदींसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
कराड तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराडच्या स्व.सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात (कॉटेज हॉस्पिटल) रोटरी क्लब
ऑफ कराडच्या दृष्टी अभियान माध्यमातून दर महिन्यातून एकदा मोफत नेत्र शस्त्रक्रिया (मोतिबिंदू) करण्यात येणार आहे. संस्कार नेत्र रुग्णालयाचे संचालक रोटरीन डॉ.राहुल फासे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 16 रुग्णांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया करुन रुग्णांना फेरतपासणी करुन डिस्चार्ज देण्यात आला.
वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनीला लाळे यांनी रोटरी क्लबच्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा फायदा हा नेहमीच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होत असल्याचे सांगत रोटरी क्लब ऑफ कराडच्या कामाचे कौतुक केले.
रो.डॉ.राहूल फासे यांनी डोळ्यांची निगा, नेत्र विकार आणि उपचार पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. रो.शिवराज माने यांनी मार्गदर्शन केले. रुग्णाचे नातेवाईक सौ.म्हस्के यांनी रोटरी क्लब ऑफ कराड व कॉटेज हॉस्पिटल कराड हे
समाजासाठी राबवत असलेल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. चोपडे यांनी स्वागत केले. रो.रामचंद्र लाखोले यांनी प्रास्ताविक केले. रो.आनंदा थोरात यांनी आभार मानले.