आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रहोम

राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कारचे शनिवारी होणार वितरण

 

कराड / प्रतिनिधी : –

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त यशवंत नगरी न्यूज नेटवर्क च्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून या पुरस्काराचे वितरण कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन ,(टाऊन हॉल) येथे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता होणार असल्याची माहिती यशवंत नगरी संपादक विकास भोसले यांनी दिली.

या सन्मान सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल अजिंक्य खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, वरिष्ठ संपादक राजा माने(मुंबई), कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील १५ क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असून यावेळी डॉ.अनंतकुमार गुजर,(प्राचार्य,जयवंत इंजिनिअरिंग कॉलेज, किल्लेमच्छिंद्रगड) यांना शिक्षण रत्न पुरस्कार, सलीम शेख (महाव्यवस्थापक,दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक )यांना सहकार गुणवंत अधिकारी पुरस्कार,सुभाष जाधव (मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठापूर) यांना शिक्षण गौरव पुरस्कार ,श्रीमती मालन लाला माने,(सातारा) यांना आदर्श माता पुरस्कार,राजेंद्र गंगाराम भोसले (संचालक टाॅपसेल अप्लायसेस प्रा. लि. सिलवासा,दादरा नगर हवेली गुजरात)यांना उद्योगरत्न पुरस्कार, सौ.ज्योती दीपक शिंदे, (मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक विद्यालय मलकापूर) यांना शिक्षण गौरव पुरस्कार,शुभम यादव,(संचालक भलरी हायटेक नर्सरी अतीत) यांना युवा कृषिरत्न पुरस्कार ,प्रमोद देशमाने(संस्थापक अध्यक्ष, महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी, शिवडे) यांना सहकार रत्न पुरस्कार,संग्राम पवार (लोकनियुक्त सरपंच वहागाव) यांना आदर्श सरपंच पुरस्कार, दत्तात्रय पवार ,(विकास अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड) यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार,अविनाश काशीद (पत्रकार पुसेसावळी) यांना आरोग्य पत्रकरिता पुरस्कार,सौ.दीपलीताई सूर्यकांत खोत (अध्यक्ष लाडकी बहीण शासकीय योजना कराड तालुका) यांना समाजरत्न पुरस्कार,सौ.सविता विकास राऊत,(लोकनियुक्त सरपंच आर्वी ता. कोरेगाव) यांना आदर्श महिला सरपंच पुरस्कार,अशोक गुरव(कोयना वसाहत, कराड) यांना शिक्षणरत्न पुरस्कार ,दत्तात्रय घाडगे (पत्रकार कामेरी)संपादक लोकराज्य यांना आदर्श पत्रकरिता पुरस्कार दिला जाणार आहे.ग्राम स्वच्छता व जलसंधारणासाठी उत्कृष्ट काम केलेल्या नागझरी ग्रामविकास संस्था नागझरी या संस्थेला सन्मानित केले जाणार आहे.

या सन्मान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Articles