आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

उद्योजक मधुकर सावंत यांना सेवाव्रती पुरस्कार

कराड / प्रतिनिधी : –

सैदापूर -गोवारे येथील गजानन हाऊसिंग सोसायटी व श्री गजानन सेवा ट्रस्टतर्फे यंदा श्री गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोसायटीतील रहिवाशी व उद्योजक मधुकर सावंत यांना यावर्षीचा गजानन सेवाव्रती पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन जयंत पाटील व ट्रस्टचे अध्यक्ष रोहित राव यांनी दिली.

ते म्हणाले, दरवर्षी गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी शुक्रवार (दि.३१) सकाळी ११ वाजता अथर्वशीर्ष पठण व हळदी कुंकू कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता सोसायटी व संलग्न वसाहती, कॉलन्यांमध्ये श्रींचा छबिना निघेल. शनिवार (दि.१) सकाळी ७.३० वचाजता श्री गणेश याग व आरती होईल. दुपारी साडेबारा १२.३० नंतर मंदिराजवळील गणेश उद्यानात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी ४ वाजता अंतर्नाद ग्रुपतर्फे संगीत गायन सेवा होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल.

उद्योजक श्री. सावंत यांना यावर्षीचा श्री गजानन सेवाव्रती पुरस्काराचे वितरण सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता दिपमाळ प्रज्वलन व महाआरतीचे आयोजन केले आहे. सर्व कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त, सोसायटीचे संचालकांनी केले आहे.

Related Articles