दादासाहेब मोकाशी महाविद्यालयातील विद्यार्थीनी बनली अधिकारी

कराड/प्रतिनिधी : –
मोकशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयात सन २०१४ ते २०१८ या कालावधी कृषी पदवी संपादन केलेली विद्यार्थीनी अर्चना माळी हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातंर्गत अन्न व औषध प्रशासकीय सेवा अधिकारीपदी निवड झाली आहे.
अर्चना दगडू माळी-तोडकर हिने प्रशासकीय अधिकारी बनण्याची जिद्द बाळगून कष्टाने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केले. अर्चनाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, नागज, माध्यमिक शिक्षण श्री सिद्देश्वर हायस्कूल व पदवी शिक्षण दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयात पुर्ण केले. सन २०२३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध अधिकारी (राजपत्रित) पदी अर्चना माळी-तोडकर हिची निवड झाली आहे.
अर्चना माळीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली आहे. त्याबद्दल मोकाशी कृषी प्रतिष्ठानचे सचिव अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक विलास चौधरी यांनी कौतुक केले. तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटूकडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.