सातारा जिल्हाहोम

‘कृष्णा’वर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार 

राज्यातील नामवंत कबड्डी संघाचा सहभाग

कराड/प्रतिनिधी : –
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी सामन्यांना उत्साहात प्रारंभ झाला आहे.  कबड्डीचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असून मुंबई, पालघर, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर,सांगली, सातारा  जिल्ह्यातील 50 हून अधिक संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
सामन्यांचे उद्घाटन कारखान्याचे  संचालक लिंबाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे.डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी.एन, देशपांडे, मनोज पाटील, एम. के कापूरकर, बाळासाहेब पाटील, प्राचार्य डॉ.अशोक फरांदे, धोत्रेवाडीचे सरपंच प्रदीप माने यांची यावेळी उपस्थिती होती.
 

Related Articles