कोळेवाडी शाळेच्या बाल बाजारात ४० हजारांची उलाढाल

विद्यानगर / प्रतिनिधी : –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी या ठिकाणी बाल बाजाराचे आयोजन केले होते. या बाल बाजारांमध्ये एकूण ७६ विद्यार्थ्यांनी आपली दुकाने लावली होती. या अतिशय दिमाखदार अशा बाल बाजाराचे आयोजन शाळेने केले होते. या बाल बाजाराचे उद्घाटन कोळेवाडी च्या माजी सरपंच रत्नमाला पाटील. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रेश्मा वीर सदस्य आफरीन मुल्ला,अनुमिता भागवत,मुख्याध्यापक भारती लोकरे,जेष्ठ शिक्षिका शोभाताई चव्हाण,नीलम पाटील प्रदीप कुमार पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला या बाल बाजाराला पालक वर्गसह आजी माजी विद्यार्थी माझी शिक्षक यांनी व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण ही घेता यावे. या अनौपचारिक शिक्षणामधून गणित या विषयाचे शिक्षण त्याचबरोबर नोटा नाणी, बेरीज वजाबाकी, वजने मापे, देवाणघेवाण,लोकांशी वार्तालाप करता येणे,आपली वस्तू विकण्यासाठी आवश्यक कौशल्य गुण अंगी बानवणे या सर्व कौशल्यांचा विकास साधण्याची संधी मिळवून देण्यासाठी या बाल बाजाराचे आयोजन केले होते. या बाल बाजारामध्ये कोळेवाडी शाळेतील ७६ विद्यार्थी व्यापार्यानी आपली दुकाने सजवली होती. या दुकानांमध्ये भाजीपाला, कडधान्य, खाऊचे पदार्थ,संक्रातीच्या वाणवशासाठी आवश्यक पदार्थ, किराणामाल,मेकअपचे साहित्य,चहाचे स्टॉल,चायनीज पदार्थांचे स्टॉल अशा विविध प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते.या बाल बाजाराला ४०० पेक्षा जास्त कोळेवाडीकरांनी भेट देऊन मुक्तहस्ताने आपल्या विद्यार्थ्यांकडून खरेदी केली. याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनीही आपल्या खिशातील पैसे रिकामे करून सामोसा,वडापाव,पॅटीस,कोबी मंचुरियन, चहा,कुरकुरे यासारख्या पदार्थावर ताव मारला.यामुळे बाल बाजाराची विक्री ४०००० च्या पेक्षा जास्त झाली.
अनेक पालकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी,माजी शिक्षकांनी या बालबाजारला भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि बाल बाजाराच्या उत्कृष्ट आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळेचे कौतुक केले.भेट देणाऱ्यांमध्ये रमेश ढवळे,शिवाजीराव आवळकर,शंकरराव पाटील,दिलीप देशमुख,राजश्री टेके नलवडे मॅडम यांच्यासह अनेक पालक होते.याच बाल बाजारामध्ये स्काऊट गाईडच्या खरी कमाई या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये १०२५ रुपयाची खरी कमाई करण्यात आली. याचबरोबर बाजार हा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा स्रोत आहे याची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी ग्रामपंचायत कराची ही वसुली करण्यात आली.विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पावत्या देऊन दोन रुपयाप्रमाणे ग्रामपंचायत कर वसूल करण्याचे काम स्वयंसेविका काजल नलवडे व श्रद्धा कुरकुटे यांनी केले.हा बालबाजार यशस्वी करण्यासाठी शुभांगी गुजर,प्रमोद गायकवाड,मंगल पाटील,संध्या शेजवळ यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण बाल बाजाराचे सूत्रसंचालन संदीप कोरडे यांनी केले.
चौकट बाल बाजाराला अमेरिकन पाहुण्यांची भेट.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळेवाडी येथे भरलेल्या बाल बाजाराला आज अमेरिकन पाहुण्यांनी भेट दिली. मूळचे पाटण तालुक्यातील असलेले आणि सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले सागर पाटील आणि ऐश्वर्या पाटील यांनी येथे भेट दिली.त्यांनी मुलांकडून वस्तू खरेदी करतानाच या ठिकाणच्या बाल बाजाराचे मनापासून कौतुक केले.मुलांना व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी अशा बाल बाजाराची आवश्यकता आहे.जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षण हे मुलांचा सर्वांगीण विकास करते असेही कौतुकाचे बोल त्यांनी व्यक्त केले.अमेरिकन पाहुण्यांच्या भेटीची सर्वत्र चर्चा होती.