शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात उद्या पत्रकार सन्मान सोहळा

कराड / प्रतिनिधी : –
येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयमध्ये सोमवारी (दि. ६ जानेवारी) मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात मराठी पत्रकार दिन व सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यानुसार यावर्षीही सोमवार (दि. ६) रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयातील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सभागृहामध्ये मराठी पत्रकार दिन व सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकार व पणन मंत्री, तथा सह्याद्री सहकारी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत, अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, प्राचार्य डॉ. सतीश घाडगे असणार आहेत. तरी या कार्यक्रमास कराड व तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींनी अगत्याने उपस्थित रहावे, असेही आवाहन प्राचार्य डॉ. सतीश घाडगे, पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. स्नेहलता शेवाळे, सदस्य प्रा. संभाजी पाटील, प्रा. जीवन आंबुडारे व शशिकांत पाटील यांनी केले आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे.