सातारा जिल्हाहोम

टिळक हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात खाद्य महोत्सव उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 
शिक्षण मंडळ, कराड संचालित टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षण मंडळ कराडचे संचालक बॅरिस्टर विक्रम कुलकर्णी यांनी खाद्य महोत्सवाचे उद्घाटन फीत कापून व श्रीफळ वाढवून केले.
यावेळी बोलताना श्री कुलकर्णी म्हणाले,  पाककला हे मानवी जीवनातील खूप मोठे कौशल्य आहे,ते आता उदरनिर्वाहाचे फार मोठे साधन आहे, जागतिक बाजारपेठेमध्ये रुचकर व पौष्टिक भारतीय खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे,म्हणून विद्यार्थिनींनी पाककलेमध्ये प्राविण्य प्राप्त करावे.
याप्रसंगी गृहशास्त्र विभागाने तयार केलेल्या हिवाळ्यातील रुचकर व पौष्टिक पदार्थ या भित्तिपत्रकाचे व समाजशास्त्र विभागाने तयार केलेल्या भारतीय व पश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचे योगदान या विषयावरील भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.खाद्य महोत्सवात विद्यार्थिनींनी
अत्यंत स्वादिष्ट,रुचकर खमंग मुगाचे मेथीचे पराठे,पुलाव, थालीपीठ,बाजरीची भाकरी खर्डा, पाणीपुरी, समोसे,दूध खीर,पावभाजी, केक,लाडू,बटाटा,चिक्की,खारी शेंगदाणे असे विविध पदार्थ मानले होते.
खाद्यपदार्थांचे परीक्षण मानसी जोशी व सविता जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे योग्य नियोजन गृहशास्त्र विभागाच्या प्रमुख सीमा पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य धनाजी देसाई, उपप्राचार्य अरुण कोडोली,पर्यवेक्षक राजेश धुळुगडे,कार्याध्यक्षा सुनिता पाटील,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Related Articles