आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्र

प्रशांत यादवांच्या वाढदिवसानिमित्त संगमेश्वरात मोफत नेत्र तपासणी शिबीर

देवरुख / विशेष प्रतिनिधी : –

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत बबन यादव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत यादव मित्रमंडळाकडून संगमेश्वर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व चस्मा फ्रेम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक २४ डिसेंम्बर रोजी देवरुख शहरातून या शिबिराची सुरुवात होत आहे.

प्रशांत यादव यांचा वाढदिवस ५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.त्यानिमित्ताने चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून प्रशांत यादव मित्रमंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमांची जोरदार तयारी करत आहेत.चिपळूणमध्ये ५ ते ९ जानेवारी दरम्यान कृषी व पशुधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तर संगमेश्वर तालुक्यात देखील आरोग्य शिबीरे तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.एकूणच हा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. प्रशांत यादव मित्रमंडळाच्या वतीने संगमेश्वर तालुक्यात मोफत नेत्र तपासणी व चस्मा फ्रेम शिबिराचे आयोजन विविध भागात करण्यात आले आहे.त्यानुसार देवरुख येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नेत्र तपासणी व चस्मा फ्रेम शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच २५ डिसेंम्बर रोजी तुळसणी,२७ डिसेंबर रोजी ताम्हाणे,२८ डिसेंबर रोजी बुरंबी,२९ डिसेंम्बर रोजी माखजन आणि ३० डिसेंबर रोजी तुरळ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण येथील कुलकर्णी नेत्र रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर व संपूर्ण टीम या शिबिरात सहभागी होऊन तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.तर न्यू ऑप्टिकल मिरज यांच्या वतीने चस्मा फ्रेम मोफत मिळणार आहे.काचेचे मात्र पैसे द्यावे लागणार आहे.गरजुनी या शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत यादव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असून 7507178827 या क्रमांकावर संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles