सातारा जिल्हाहोम

स्व. जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कृष्णा कारखान्यावर वसंत भोसले यांचे व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : – 
सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी निमित्त य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ज्येष्ठ संपादक वसंत भोसले याचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कराड तालुका साखर कामगार संघाच्यावतीने देण्यात आली आहे.
सहकारमहर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार सोमवार, दि. 23 रोजी दुपारी 2 वाजता य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराड तालुका साखर कामगार संघ, शिवनगर व श्री गणेश शिवोत्सव मंडळ, शिवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या व्याख्यानास उपस्थित रहावे, असे आवाहन कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर व श्री गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Related Articles