सातारा जिल्हाहोम

सौ. अश्विनी पाटील यांची भाजपा महिला सुरक्षा संघटनेच्या कराड तालुकाध्यक्षापदी निवड

कराड/प्रतिनिधी : – 
कापिल (ता. कराड) येथील सौ. अश्विनी प्रमोद पाटील यांची भाजपा महिला सुरक्षा संघटना, नवी दिल्ली (भारत) या राष्ट्रीय संघटनेच्या कराड शहराध्यक्षापदी निवड झाली आहे. सदर निवडीचे पत्र संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ. साधना पाटील – हरपळे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
सौ. अश्विनी पाटील यांनी महिलांविषयी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची संघटनेच्या कराड शहराध्यक्षापदी निवड करण्यात आले आहे. त्याचबरोबर या निवडीनंतर आपल्या कार्यक्षेत्रातील महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगीक शोषण, कौटुंबिक हिंसाचार या व अशा अनेक महिलांच्या समस्यांचे योग्य प्रकारे निवारण करुन महिलांना न्याय देण्याचे कार्य करावे. तसेच संघटनेने ठरवून दिलेल्या ध्येय धोरणांच्या आधारे संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही प्रदेशाध्यक्षा सौ. पाटील – हरपळे यांनी व्यक्त केली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मोहसीन आंबेकरी, तसेच भाजपा कराड शहर व तालुक्याच्यावतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Related Articles