सातारा जिल्हाहोम
कृष्णा कारखान्यातील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आयोजित आरोग्य तपासणी शिबीराला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. शिबीरात ६५० कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. मा. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांनी देशाचे प्रकृती अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानात कृष्णा कारखाना सहभागी झाला आहे. जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किल्ले मच्छिंद्रगड यांच्या सहकार्यातून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्या डॉ. वर्षा देशपांडे, प्रा.पल्लवी कुलकर्णी व प्रथम वर्षाच्या दोन विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्या डॉ.वर्षा देशपांडे यांनी त्रिदोषाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्यामुळे मनुष्य जीवन शैलीमध्ये होणारा बदल या विषयी सविस्तर विवेचन केले. डॉ. श्री निधी सबनीस यांनी आयुर्वेदाचे महत्व स्पष्ट करत दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ६५० कर्मचाऱ्यांची नोंदणी प्रकृती प्रशिक्षण अँपद्वारे करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना प्रकृतीप्रमाणे त्यांना आहारातील विविध लेखी सूचना देण्यात आल्या व प्रत्येकाला स्वतंत्र मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला टेक्निकल को ऑर्डीनेटर एस.डी. कुलकर्णी, एच आर मॅनेजर संदीप भोसले, एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, को जन मॅनेजर गिरीश इस्लामपूरकर, प्रभारी कार्यालयीन अधीक्षक विलास पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमीन शिकलगार, स्टोअर किपर गोविंद मोहिते, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, अजित पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन एच आर मॅनेजर संदीप भोसले, जगन्नाथ जगदाळे, सिव्हिल विभागाचे जयवंत शिंदे यांनी केले.